12 December 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

KPI Green Energy Share Price | फुकट शेअर्स मिळवण्याची संधी सोडू नका! हा शेअर सुद्धा मल्टिबॅगर आहे, अल्पावधीत पैसा वाढवा

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी गुंतवणुकदारांना एक मोठी भेट देणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Bonus Shares

कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली नाहीये. ही कंपनी गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देत आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 1.46 टक्के घसरणीसह 1,407.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 5000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 28.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जानेवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 1490 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 3 वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5045 टक्के वाढवले आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 1490 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. तर या शेअरची नीचांकी किंमत पातळी 388.55 रुपये होती.

मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 450.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 1 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 1490 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 6 महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

3 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 874.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी आता दुसऱ्यांदा मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहे. दुसरी वेळ आहे जेव्हा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना या कंपनीने जानेवारी 2023 मध्ये गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x