
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह 3,156.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.6 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
नुकताच हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने भारतीय शेअर बाजार नियामक सेबीकडून अदानी समूह प्रकरणाबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीस प्राप्त झाल्याची माहिती जाहीर करताच अदानी समूहाचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले होते. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या तज्ञांनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अंबुजा सिमेंट्स स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
जानेवारी 2022 मध्ये यूएस-स्थित शॉर्ट सेलर फर्मने अदानी समूहाच्या विरोधात एक वादग्रस्त अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानींच्या एकूण मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये 150 अब्ज डॉलर्सची घट झाली होती. अदानी एंटरप्रायझेस स्टॉक दैनिक चार्टवर 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. आता हा स्टॉक आपल्या 50 दिवसांच्या SMA पातळीच्या जवळ पोहोचला आहे.
आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 3,185 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी इंटरप्राईस कंपनीचा स्टॉक 3,322 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3,100 रुपये स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.6 टक्क्यांच्या वाढीसह 1,483.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.2 लाख कोटी रुपये आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी अदानी पोर्ट्स कंपनीची व्हॉल्यूम वाढ 11 टक्के आणि महसूल वाढ 14 टक्के, EBITDA मधील वाढ 15 टक्के, आणि PAT 19 टक्के CAGR दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट स्टॉक पुढील काळात 1700 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 4 टक्के वाढीसह 926.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटींवर पोहोचले आहे. अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह 343.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा मार्केटकॅप 44,000 कोटींपेक्षा जास्त आहे. ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टेकच्या तज्ञांनी अदानी विल्मर स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर करून 374 रुपये टार्गेट प्राइससाठी कव्हरेज सुरू केले.
ACC Ltd स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह 2843 रुपये किमतीवर पोहोचला होता. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह 1,028.40 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.15 लाख कोटी रुपये आहे. सोमवारी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड स्टॉक 1775.95 रुपये, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 706.85 रुपये, आणि अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 723.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.74 टक्के वाढीसह 715.85 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.