
Adani Power Share Price | नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गौतम अदानी समूहाला एक जबर दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अदानी पॉवर कंपनीच्या विलंब पेमेंट अधिभार म्हणजेच एलपीएस बाबत विनंतीच्या अर्जवर विचार करण्यास नकार दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
त्यामुळे अदानी पॉवर स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवर कंपनीला 50 हजार रुपयेचा दंड देखील आकारला आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 2.35 टक्के घसरणीसह 516.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने अदानी पॉवर कंपनीला फटकारले आणि एलपीएससाठी स्वतंत्र अर्ज दाखल करणे हा योग्य कायदेशीर मार्ग नाही असे विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवर कंपनीला 50000 रुपये दंड देखील आकारला आहे. अदानी पॉवर कंपनीने जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेड या राजस्थान सरकारच्या मालकीच्या वीज वितरण कंपनीकडून एलपीएस म्हणून 1,376 कोटी रुपये अतिरिक्त रकमेची मागणी केली होती.
अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड कंपनीच्या अर्जामध्ये, जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेड कंपनीकडून 1,376.35 कोटी रुपये अतिरिक्त पेमेंटचा दावा करण्यात आला होता. कंपनीने असा युक्तिवाद केला की, ऑगस्ट 2020 मध्ये झालेला नियमातील बदल आणि 28 जानेवारी रोजी राजस्थान डिस्कॉमसोबत झालेल्या वीज खरेदी करारानुसार बेअरिंग कॉस्ट, ज्यात उशीरा पेमेंट केल्यास अधिभार लावण्याची तरतूद होती, हे भरपाईच्या अधीन आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के घसरणीसह क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक जवळपास 2 टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे. या कंपनीचे शेअर्स 6 डिसेंबर 2023 रोजी 589.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.