3 May 2025 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Adani Wilmar Share Price | 58 टक्क्यांनी स्वस्त झालेला अदानी विल्मर शेअर सुसाट तेजीत, पुढे मल्टिबॅगर परतावा?

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान प्रचंड खरेदी पाहायला मिळाली. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 5.24 टक्के वाढीसह 369.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी विल्मर स्टॉक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारने मार्च 2025 पर्यंत किमान आयात शुल्क दराने खाद्यतेलाची आयात करण्याला परवानगी दिली आहे.

मागील एका महिन्यात अदानी विल्मर कंपनीच्या शेअरची किंमत 16.22 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 39.51 टक्के खाली आली आहे. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अदानी विल्मर स्टॉक 3.91 टक्के वाढीसह 365.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, ” भारतात कच्चे पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे सोया तेल यावरील किमान आयात शुल्क संरचना मार्च 2024 रोजी संपणार आहे, आता भारत सरकारच्या नवीन आदेशानुसार तेल रिफायनर्सना आता शुल्क संरचनासाठी मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी लागणार आहे”.

अदानी विल्मर बिझनेस ग्रुप ही कंपनी गौतम अदानी समूह आणि सिंगापूरस्थित विल्मर इंटरनॅशनल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेला संयुक्त व्यापारी उपक्रम आहे. यामध्ये दोन्ही सदस्य कंपन्यांचा वाटा 43.97 टक्के आहे. अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स सध्या 878 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 58 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

अदानी विल्मर कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 130.73 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 48.76 कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला होता. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीमध्ये अदानी विल्मर कंपनीला 78.92 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये तीव्र घसरण झाल्यामुळे अदानी विल्मर कंपनीचा कामकाजी महसूल 14,150 कोटी रुपयेवरून 13 टक्के घसरला आहे.

या तिमाहीत अदानी विल्मर कंपनीने फक्त 12,267.15 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये 18 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. लेटेस्ट तिमाही निकालानुसार अदानी विल्मर कंपनीचा EBITDA 254 कोटी रुपयेवरून 43 टक्के घसरुन 144 कोटी रुपयेवर आला आहे. याकाळात कंपनीच्या EBITDA मार्जिनमध्ये 1.8 टक्के वरून 1.2 टक्के पर्यंत घट झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Wilmar Share Price NSE 23 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या