4 May 2025 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Aeroflex Industries IPO | आला रे आला IPO आला! एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO लाँच होतोय, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या

Aeroflex Industries IPO

Aeroflex Industries IPO | नुकताच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीला IPO जाहीर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज ही स्टेनलेस स्टील होज मेकर कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 160 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तक संस्था SAT Industries आणि Italica Global FZC आपल्या मालकीचे 1.75 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. (Aeroflex Share Price)

IPO च्या DRHP कागदपत्रांनुसार SAT Industries Limited ही प्रवर्तक कंपनी आपल्या मालकीचे 1.23 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. आणि Italica Global FZC hi कंपनी OFS अंतर्गत आपल्या मालकीचे 52 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. सध्या SAT इंडस्ट्रीज या प्रवर्तक कंपनीकडे एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे 92.18 टक्के भाग भांडवलाची मालकी आहे. तर Italica Global FZC या कंपनीकडे एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे 6.52 टक्के भाग भांडवलाची मालकी आहे.

एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO ला सेबीने मंजुरी दिली आहे, असे SAT इंडस्ट्रीज या एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तक कंपनीने बुधवारी जाहीर केलेल्या माहिती म्हंटले आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मधून जमा होणारी रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च केली जाणार आहे. यासाठी एकूण 35 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. याशिवाय कंपनीला आवश्यक असणाऱ्या खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी 84 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. काही रक्कम एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या सामान्य ऑपरेशन्स आणि अधिग्रहणांवर खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे.

एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओचा आकार 350 कोटी रुपये आहे. पँटोमथ कॅपिटल अॅडव्हायझर्स यांना IPO चे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aeroflex Industries IPO today on 03 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Aeroflex Industries IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या