 
						AGI Greenpac Share Price | शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून देतात. जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल, तर तुम्ही ‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ‘एजीआय ग्रीनपॅक’ ही भारतात ग्लास कंटेनर उत्पादन करणाऱ्या अग्रणी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. तथापि केअर रेटिंग फर्मची रेटिंग जाहीर झाल्यानंतर या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी कमजोर झाले. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 348.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (AGI Greenpac Limited)
स्टॉकची कामगिरी :
‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीचे शेअर्स अल्पावधीत अस्थिर दिसत असतील, मात्र त्यांनी दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3.03 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 15.57 टक्के वाढले आहेत. मागील 5 वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 219.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने 17,055.94 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.
मार्च 2003 मध्ये ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांना 2,62,000,00 रुपये परतावा मिळाला आहे. 2003 मध्ये हा स्टॉक 1.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 348.50 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत ‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीचे शेअर सुमारे 17000 टक्के वाढले आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीने 1981 मध्ये ‘द असोसिएटेड ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे अधिग्रहण करून कंटेनर ग्लास व्यवसायात पदार्पण केले होते. ‘एजीआय ग्रीनपॅक’ ही भारतातील एक अग्रगण्य काचेचे कंटेनर उत्पादन कर्णस्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. ‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीकडे डाउनस्ट्रीम क्षेत्रात विविध इंधन पर्याय आणि उत्पादन अनुप्रयोग वापरण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. 2011 मध्ये ‘गार्डन पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ च्या अधिग्रहणासह ‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीने PET बॉटलच्या निर्मितीला सुरुवात केली होती. ‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीची स्थापना 1960 साली गुरुग्राममध्ये झाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		