
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे.
आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः कापड क्षेत्रात व्यवसाय करते. मागील काही दिवसात आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत आले आहेत. 5 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 19.89 टक्के वाढीसह 32.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 61 टक्क्यांनी वाढली आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 9.91 टक्के वाढीसह 35.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एक वर्षात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 111 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करून कंपनीचे अधिग्रहण केले होते. दिवाळखोरीच्या प्रक्रियेदरम्यान मुकेश अंबानी यांनी जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या सहकार्याने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती.
सप्टेंबर 2023 तिमाहीच्या अखेरीस, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडे आलोक इंडस्ट्रीजचे 40 टक्के भाग भांडवल होते. तर जेएम फायनान्शियल फर्मने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 10.10 रुपये होती.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. जुलै 2023 पासून आतापर्यंत आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये दुप्पट वाढ झाली आहे. जुलै 2023 मध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 35 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.