
Apar Industries Share Price |‘अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’ या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरने 3031 रुपये ही नवीन विक्रमी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 4 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 294.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 929 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,941.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 लाखावर 10.29 लाख परतावा :
ज्या गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपूर्वी ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.29 लाख रुपये झाले आहेत. या कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 361 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा स्टॉक 67 टक्के वाढला आहे.
त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 15.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,430 कोटी रुपये आहे. कंपनीच्या 13 प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 60.64 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 39.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
कंपनीची तिमाही कामगिरी :
डिसेंबर तिमाहीत अपार इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 209 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. या काळात कंपनीने 169.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीने 2228.83 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो डिसेंबर 2022 तिमाहीत विक्री 76.88 टक्के वाढल्याने 3942 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
अपार इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी विविध प्रकारचे कंडक्टर, केबल्स, पॉलिमर बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या उत्पादन विभागांमध्ये कंडक्टर, ट्रान्सफॉर्मर आणि विशेष तेल तसेच पॉवर / टेलिकॉम केबल्स देखील सामील आहेत.अपार इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल अभियांत्रिकी क्षेत्रात देखील व्यवसाय करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.