
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या ट्रान्समिशन केबल्स, स्पेशॅलिटी ऑइल, पॉलिमर आणि कंडक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे.मागील काही वर्षांत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. (Apar Share Price)
या कालावधीत शेअर्सची किंमत 4 रुपयेवरून वाढून 4000 रुपयेवर पोहचली आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4825 रुपये होती. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.31 टक्के वाढीसह 4,825.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 लाखावर दिला 11 कोटी परतावा :
10 ऑगस्ट 2001 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 ऑगस्ट 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4703.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 117197 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 ऑगस्ट 2001 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर पैसे लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 11.72 कोटी रुपये झाले असते.
10 वर्षात दिला 5100 टक्के परतावा :
मागील 10 वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर ने मजबूत कामगिरी केली आहे. 8 ऑगस्ट 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 89.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4703.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5167 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षात शेअरने 1411 टक्के परतावा
अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4825 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1172.80 रुपये होती. मागील 3 वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 1411 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.