
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 55.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 10.15 टक्के वाढीसह 58.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज या कंपनीचे शेअर्स 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Apollo Micro Systems Share)
शेअरची कामगिरी
अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स मागील सात दिवसांपासून 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील पाच दिवसात अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 64.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. बेंचमार्क निर्देशांकाच्या तुलनेत हा स्टॉक 19 टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 381.34 टक्के वाढली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात
अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेली वाढ पूर्णपणे बाजारातील सकारात्मक भावनामुळे झाली आहे. कंपनीचा शेअरमधील वाढीसोबत काहीही संबंध नाही. भारत सरकारकडून अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीला विविध ऑर्डर्स देण्यात आल्याने गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.
पुढील काळात अपोलो मायक्रोसिस्टम कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या महसूल संकलनात 50 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने तयार केलेली उत्पादने एरोस्पेस सिस्टीम, ग्राउंड डिफेन्स, स्पेस, एव्हीओनिक्स सिस्टम, होमलँड सिक्युरिटी आणि वाहतूक यासारख्या विविध क्षेत्रात वापरले जातात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.