 
						Ashok Leyland Share Price | ऑटो सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी अशोक लेलँडचे शेअर्स शुक्रवारी 2.30% घसरून 225 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 ट्रेंडिग सेशन्समध्ये हा शेअर (NSE: ASHOKLEY) 6.56% घसरला आहे. मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये 242 रुपये किमतीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा शेअर तेजीचे संकेत देत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत दिसू लागल्याने तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.06 टक्के घसरून 223 रुपयांवर ट्रेड करत आहे.
तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सवर 255-260 रुपये टारगेट प्राइस निश्चित करताना BUY रेटिंग दिली आहे. मात्र तज्ज्ञांनी शेअर खरेदी करताना त्यासाठी 230 रुपये प्राईसवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. त्यामुळे येत्या काळात हा शेअर मजबूत नफा कमावून देईल असं म्हटलं जातंय.
5 वर्षांत दिला 260% परतावा
या शेअरच्या परताव्याबाबत बोलायचे झाल्यास, मागील 1 आठवड्यात या ऑटो कंपनीचा शेअर 0.23 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत या ऑटो शेअरने गुंतवणुकदारांना 36% टक्के परतावा दिला आहे. तसेच मागील एका वर्षात गुंतवणूकदारांनी 34% कमाई केली आहे. दरम्यान, या शेअरने मागील 2 वर्षात 55.68% आणि मागील 5 वर्षांत 260% इतका मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
कंपनीचा डिव्हीडंड इतिहास
या वर्षी एप्रिल महिन्यात या ऑटो क्षेत्रातील कंपनीने प्रति इक्विटी शेअर 4.95 रुपये इतका डिव्हीडंड दिला होता. तत्पूर्वी अशोक लेलँड कंपनीने जुलै 2023 मध्ये प्रति इक्विटी शेअर 2.60 रुपये इतका डिव्हीडंड दिला होता. तर जुलै 2022 मध्ये या ऑटो कंपनीने प्रति इक्विटी शेअर 1 रुपये आणि ऑगस्ट 2021 मध्ये प्रति इक्विटी शेअर 0.60 रुपये इतका डिव्हीडंड दिला होता असं आकडेवारी सांगते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		