
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 241.50 रुपये या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर स्टॉक किंचित खाली आला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, मागील आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांची, विशेषतः ट्रॅक्टरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, “नजीकच्या काळात ऑटो स्टॉक्स इतर सर्व व्यवसाय विभागांना मागे टाकतील”. भारतीय अर्थव्यवस्थेतील लवचिकता आणि अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी हे घटक वाहतूक कंपन्याच्या शेअर्समधील वाढीसाठी सकारात्मक ट्रिगर ठरू शकतात. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.95 टक्के वाढीसह 239.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मजबूत अर्थव्यवस्था आणि अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स यांच्यातील संबंध स्पष्ट करताना तज्ञांनी म्हंटले आहे की, मजबूत अर्थव्यवस्थेत खरेदीदारांची क्रयशक्ती वाढते. वाढलेल्या उत्पन्नामुळे लोक घरे, वाहने आणि इतर जीवनशैलीतील चैनीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याचा फायदा बांधकाम व्यवसाय करणाऱ्या आणि वाहन उत्पादन करणाऱ्या अशोक लेलँड सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने 225 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि या स्टॉकला 250 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे.
तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक प्रतिकार पातळीच्या पार गेला तर शेअर 270 रुपये किमतीवर जाऊ शकतो. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 225 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान मागील आठवड्यात निफ्टी 50 निर्देशांकाने 23,441 या आपल्या नवीन उच्चांक स्पर्श केला होता. तर बीएसई सेन्सेक्स 77,079 अंकावर पोहोचला होता. निफ्टी बँक निर्देशांकाने देखील 50,000 ची पातळी स्पर्श केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.