12 December 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. हिंदुजा ग्रुपचा भाग असेलल्या या व्यावसायिक वाहने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच महाराष्ट्र सरकारच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अशोक लेलँड कंपनीला बसेसचा पुरवठा करण्यासाठी मोठी ऑर्डर दिली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

त्यानंतर अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. 2024 या वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.27 टक्के घसरणीसह 227.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

नुकताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने अशोक लेलँड कंपनीला 2,104 बसेसचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले होते. हे MSRTC कडून देण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे कंत्राट आहे. या बसेसची निर्मिती अशोक लेलँड कंपनीच्या विशेष ‘बस बॉडी’ प्लांटमध्ये केली जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या ऑर्डरचे एकूण मुल्य 981.45 कोटी रुपये आहे.

मागील एका वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात अशोक लेलँड स्टॉक 22 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 245.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 157.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 66,847 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x