 
						Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 209.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आणि दिवसाअखेर हा स्टॉक 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
आज शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. मे 2023 मध्ये या कंपनीचे शेअर 144.20 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड स्टॉक 2.11 टक्के वाढीसह 211 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ञांच्या मते, अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 टक्के वाढू शकतात. ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजच्या मते, अशोक लेलँड स्टॉक 223-232 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्म SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, अशोक लेलँड स्टॉकने एप्रिल 2024 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत 10 टक्के वाढ नोंदवली आहे.
कंपनी पुढील आठवड्यात आपले 2024 च्या मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करू शकते. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी, अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, अशोक लेलँड स्टॉक 225 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 200 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
31 मार्च 2024 पर्यंत अशोक लेलँड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 51.52 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. FII ने या कंपनीचे 21.45 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 11.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. अशोक लेलँड कंपनीने 24 मे रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे, या बैठकीमध्ये मार्च 2024 तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		