
Authum Investment Infra Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4353 टक्के नफा मिळवून दिला आहे. 12 जून 2020 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 हा स्टॉक 326 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ज्या गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.53 लाख रुपये झाले आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के वाढीसह 327.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशोक म्हणजेच RSI इंडेक्स 74.7 अंकावर आहे. यावरून असे कळते की, हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सचा बीटा 1.6 असून तो एका वर्षातील उच्च अस्थिरतेचे दर्शक मानला जातो. ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे.
मागील एका महिन्यात ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या NBFC कंपनीच्या स्टॉकमध्ये 49 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या दोन प्रवर्तकांकडे मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीपर्यंत 71.47 टक्के भाग भांडवल होते. 6790 सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 28.53 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मार्च 2023 च्या तिमाहीत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फर्मने मागील आर्थिक वर्षात मार्च तिमाहीत 103.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर या मार्च तिमाहीत कंपनीला 134.28 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.
मार्च 2022 च्या तिमाहीत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची विक्री 147.10 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर मार्च 2023 तिमाहीत कंपनीची विक्री 118.14 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा ऑपरेटिंग नफा 138.74 कोटी रुपयेवर पोहचला, जो मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत 122.77 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.