15 December 2024 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरमध्ये कमालीची तेजी, स्वस्त झालेला शेअर आता पैसा वेगात वाढवतोय, स्टॉक प्राईस पहा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. याकाळात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा कंपनीच्या शेअरने 16.22 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. 6 सप्टेंबर 2022 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 15.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीने 322 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. यापूर्वी 2021-22 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 658 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीने 1856 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 1878 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. रिलायन्स पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाने पुनीत नरेंद्र गर्ग यांची नॉन एक्झिक्युटिव्ह नॉन डिपेंडेंट पदावर नियुक्ती केली आहे.

मागील तीन वर्षांच्या कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 525 टक्के परतावा कमावला आहे. मागील दोन वर्षे, एक वर्ष किंवा सहा महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स पॉवर स्टॉकने गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. तीन महिने, एक महिना आणि एका आठवड्यात रिलायन्स पॉवर स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 40 टक्के वाढवले आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 75.01 टक्के आहे. तर कंपनीच्या, प्रवर्तकानी कंपनीचे 24.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. 2008 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 261 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या सर्वकालीन उच्चांक किंमतीपेक्षा हा स्टॉक 94 टक्के कमजोर झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 13 June 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x