2 May 2025 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

AXIS Bank Share Price | बँक FD पेक्षा अधिक परतावा, ऍक्सिस बँकेचा शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणुकीचा विचार करा

AXIS Bank Share Price

AXIS Bank Share Price | शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात खाजगी क्षेत्रातील ‘अॅक्सिस बँक’ चे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या घसरणीवरसह ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँकेने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत अॅक्सिस बँकेला 5728 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेअरमध्ये काही प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता.

AXIS Bank Limited Stock Price Today on NSE & BSE

तोटा होऊनही अनेक ब्रोकरेज हाऊसेस अॅक्सिस बँकेच्या शेअर्सबाबत उत्साही आहेत. बहुतांश तज्ञांनी ॲक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. व्याजातून मिळणारे बँकेचे उत्पन्न अंदाजानुसार आले आहे. मागील 3 वर्षात ॲक्सिस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अॅक्सिस बँक लक्ष किंमत :
जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने अॅक्सिस बँकेच्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली असून शेअरची लक्ष किंमत 1100 रुपयेवरून कमी करून 1000 रुपये जाहीर केली आहे. जेफरीजने अॅक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी लक्ष किंमत 1150 रुपये निश्चित केली आहे. HSBC फर्मने ॲक्सिस बँकेच्या शेअरवर बाय रेटिंग दिली असून लक्ष किंमत 1055 रुपये निश्चित केली आहे.

मॉर्गन स्टॅनली फर्मने देखील अॅक्सिस बँकेच्या शेअरवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली असून लक्ष किंमत 1200 रुपये निश्चित केली आहे. 27 एप्रिल 2023 रोजी अॅक्सिस बँकेचे शेअर्स 881 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा प्रकारे, पुढील काळात या स्टॉकमधून 36 टक्के परतावा मिळू शकतो असे तज्ञांना वाटते. मागील 3 वर्षात ॲक्सिस बँकेने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल 2020 रोजी अॅक्सिस बँकेचे शेअर्स 444.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

ॲक्सिस बँकेचा तिमाही काळातील निव्वळ नफा अपेक्षेपेक्षा चांगला आला आहे, असे मत मॉर्गन स्टॅनलीने मांडले आहे. Axis बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्नही अंदाजानुसार आले आहे. लिक्विडिटी कव्हर रेशो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 116 टक्क्यांवरून वाढून 129 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, मॅक्वेरी फर्मने 940 रुपये लक्ष्यासह अॅक्सिस बँकेच्या स्टॉकला ओव्हरवेट रेटिंग दिली आहे.

ॲक्सिस बँक तिमाहीचे निकाल :
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत अॅक्सिस बँकेला 5728 कोटी रुपये तोटा स्सहन करावा लागला. मागील वर्षी याच तिमाहीत AXIS बँकेने 4118 कोटी रुपये नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 22-23 च्या चौथ्या तिमाहीत ॲक्सिस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढून 11742 कोटी रुपयेवर पोहोचले आहेत.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न 8819 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत ॲक्सिस बँकेचा NPA 0.47 टक्क्यांवरून कमी होऊन 0.39 टक्केवर पोहचला आहे. ॲक्सिस बँकेचा ग्रॉस एनपीए 2.38 टक्क्यांवरून कमी होऊन 2.02 टक्के नोंदवला गेला आहे. AXIS बँकेने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 1 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | AXIS Bank Share Price Today on 01 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Axis Bank share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या