 
						Bank of Baroda Share Price | ‘बँक ऑफ बडोदा’ नुकताच आपले जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या सरकारी बँकेने मार्च तिमाही 4775 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा मानला जात आहे. मागील वर्षीच्या मार्च 2022 तिमाहीच्या तुलनेत बँक ऑफ बडोदाच्या तिमाही नफ्यात 168 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Bank of Baroda Share Price Today)
तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर तज्ञांनी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते बँक ऑफ बडोदाचे शेअर्स पुढील काळात 240 रुपयांपर्यंत वाढू शकतात. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 2.47 टक्के घसरणीसह 181.30 रुपये किमतीवर (Bank of Baroda Share Price NSE) ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने बँक ऑफ बडोदा स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 240 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे बँक ऑफ बडोदाची कामगिरी मजबूत आर्थिक स्थिती, अतिरीक्त उत्पन्न आणि कमी खर्च या मुळे बँकेच्या मार्जिनमध्ये 3.53 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. त्याच वेळी बँकेच्या व्यवसाय वाढीत तिमाही आधारावर 5.6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असून निव्वळ NPA 0.9 टक्केवर आला आहे.
जेपी मॉर्गनने बँक ऑफ बडोदा स्टॉकवर 230 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ग्लोबल ब्रोकिंग आणि रिसर्च फर्म जेपी मॉर्गनने बँक ऑफ बडोदा स्टॉकला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. या बँकेच्या शेअर्ससाठी तज्ञांनी 230 रुपये लक्ष किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील चार तिमाहीत बँक ऑफ बडोदा च्या नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. दरम्यान कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीने बँक ऑफ बड़ौदा स्टॉकवर 200 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटी फर्मने बँक ऑफ बडोदा स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 220 रुपये लक्ष्य किंमत साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी जागतिक ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीजने या सरकारी बँकेच्या स्टॉकवर होल्ड रेटिंग देऊन शेअर्सवर 180 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		