
Bank of Maharashtra | कोणत्याही वेळी कर्ज घेण्याची गरज भासू शकते. मात्र, बँकांकडून कर्ज घेतल्यास बँका प्रोसेसिंग फीही आकारतात. मात्र, आता एका बँकेने प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच व्याजदरात कपात करण्याची ही घोषणा करण्यात आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र व्याजदरात
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने गृह आणि कार कर्जावरील व्याजदरात ०.२० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे, तसेच प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. तर कार लोन 0.20 ते 8.70 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
नवे दर या तारखेपासून लागू होतील
हे नवे दर 14 ऑगस्टपासून लागू होणार आहेत, अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रने दिली आहे. कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क माफी या दुहेरी लाभामुळे ग्राहकांचा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल, असे बँकेने म्हटले आहे. अशावेळी ग्राहकही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आकर्षित होतील. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरच्या किमतीतही गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे.
मजबूत परतावा – बँक ऑफ महाराष्ट्र शेअरची किंमत
एनएसईवर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव 11 ऑगस्ट रोजी 37.65 रुपयांवर बंद झाला होता. एनएसईवर बँकेचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ३८.८० रुपये आणि ५२ आठवड्यांतील नीचांकी किंमत १६.९० रुपये आहे. 11 ऑगस्ट रोजी या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.