
Bata Share Price | बाटा इंडिया कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हंटले, की आपल्या व्यवसायात धोरणात्मक भागीदारीसाठी नवीन संधी शोधत आहे. Adidas कंपनीसोबत धोरणात्मक चर्चा सुरू असल्याच्या बातमीनंतर बाटा इंडिया कंपनीने आपण भारतीय बाजारपेठेत धोरणात्मक भागीदारीसाठी नेहमी नवीन संधी शोधत असतो, अशी माहिती दिली आहे. ही बातमी आल्यावर बाटा इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाटा इंडिया कंपनीचे शेअर्स 5.3 टक्के वाढीसह 1733.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 1768 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी बाटा इंडिया कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 1,724.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पुढील टप्प्यात अडीदास आणि बाटा इंडियामधील नवीन डील स्ट्रक्चरचे काम सुरू केले जाणार आहे. गुरुवारी कंपनीने जाहीर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की, बाटा इंडिया कंपनी धोरणात्मक भागीदारीसाठी Adidas कंपनीसोबत चर्चा करत आहे. ही चर्चा सकारात्मक टप्प्यात असून कराराच्या अंतिम स्वरूपाची निश्चिती केली जात आहे. मागील 6 महिन्यांत बाटा इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे.
बाटा इंडिया कंपनीने आपण धोरणात्मक भागीदारीसाठी संधी शोधत आहोत, अशी माहिती जाहीर केल्यावर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. जेव्हा ही भागीदारीची चर्चा पूर्णत्वाच्या लेव्हलवर जाईल, तेव्हा कंपनी आपल्या दायित्वांचे पूर्णपणे पालन करेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. बाटा इंडियन कंपनीने माहिती दिली की, “आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रतीची उत्पादने ऑफर पुरवण्यासाठी बाटा इंडिया कंपनीने मागील काही वर्षांत विविध ब्रँड्ससोबत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी देखील केली आहे.”
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.