
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. अनेक ब्रोकरेज हाऊस या सरकारी कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 340 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजे हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 16 टक्के वाढू शकतो. मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, प्रभुलाल लीलाधर, मॅक्वेरी फर्मच्या तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
मॅक्वेरी फर्म – BUY रेटिंग
आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 291.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 294 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 0.87 टक्के वाढीसह 294.35 रुपये किमतीवर पोहोचला होता. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,15,163.34 कोटी रुपये आहे. मॅक्वेरी फर्मने बीईएल कंपनीच्या शेअर्सवर 350 रुपये टारगेट प्राईस जाहीर केली आहे. बीईएल कंपनीच्या 2025-26 मधील एकूण ऑर्डर पाइपलाइनपैकी 70 ते 80 टक्के एकल निविदा ऑर्डर आहेत.
शेअरने 1274% परतावा दिला
मागील 1 आणि 2 आठवड्यात बीईएल कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 2.80 टक्के आणि 2.22 टक्के वाढले होते. मागील 1 आणि 3 महिन्यांत बीईएल कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 4.54 टक्के आणि 5.67 टक्के घसरले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 57.88 टक्के परतावा कमाल दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्ष या काळात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 114.74 टक्के, 173.68 टक्के, 326.62 टक्के, 683.66 टक्के आणि 1274.82 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.