
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 46.17 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 315.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( बीईएल कंपनी अंश )
बीईएल कंपनीचा शेअर 340.35 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 7.21 टक्क्यांनी घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.35 टक्के घसरणीसह 314.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाहीत बीईएल या नवरत्न पीएसयू कंपनीने 19.6 टक्के वाढीसह 4,199 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
या तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76,705 कोटी रुपयेवर पोहचला होता. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 41 टक्क्यांनी वाढून 937 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीईएल स्टॉक मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे.
टेक्निकल चार्टवर या कंपनीच्या शेअर्सने 310-295 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या वर टिकला तर अल्पावधीत शेअरची किंमत 338-340 रुपये किमतीवर जाऊ शकते. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, बीईएल स्टॉकची सपोर्ट लेव्हल 310 रुपये किमतीवर असेल. तर रेझिस्टन्स 327 रुपये किमतीवर असेल.
तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये ब्रेकआऊट झाल्यास शेअर 340 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या शेअरची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 305 रुपये ते 345 रुपये दरम्यान असेल. रेलीगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक 335 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक 310 रुपये किमतीवर खरेदी करावा. मात्र 305 रुपये किमतीवर कडक स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. जून 2024 पर्यंत भारत सरकारने बीईएल कंपनीचे 51.14 टक्के भागभांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.