3 May 2025 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

BEL Share Price | सुवर्ण संधी! भरवशाचा मल्टिबॅगर BEL कंपनीचा शेअर अल्पावधीत 25 टक्के परतावा देईल

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स सेक्टरमधील पीएसयू कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते. मजबूत ऑर्डर बुक आणि मजबूत महसूल दृष्टीकोनच्या आधारावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )

मागील एका वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. ब्रोकरेज हाऊस UBS ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के वाढू शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 215.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

UBS फर्मच्या तज्ञांच्या मते, बीईएल कंपनीचे शेअर्स पुढील काळात 257 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 6 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 210 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215.35 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 89.68 रुपये होती.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या आहेत. हा कंपनीला आतापर्यंत 30,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 31000 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. तर आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 50000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

मागील काही वर्षापासून केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. याचा फायदा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला आणि डिफेन्स सेक्टरमधील इतर कंपन्यांना देखील होत आहे. आर्थिक वर्ष 25/26 मध्ये कंपनीचे उत्पन्न 14 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा PE मल्टिपल 30 वरून 35 झाला आहे. म्हणजेच हा स्टॉक अजूनही 10 टक्के सवलतीने शेअर बाजारात ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 08 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या