16 April 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Berger Paints India Share Price | कलर कंपनीचा शेअर, आयुष्याला रंग, 1 लाखावर दिला 1.15 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स पहा

Berger Paints India Share Price

Berger Paints India Share Price | ‘बर्जर पेंट्स’ या पेंट क्षेत्रातील शेअर्स मागील पाच दिवसांत दोन टक्क्यांनी वधारले आहेत. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.38 टक्के वाढीसह 558.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 3 टक्क्यांनी वर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शेअरची किंमत सध्याच्या किंमत पातळीपासून 9 टक्क्यांनी खाली येऊ शकते. तज्ञांनी बर्जर पेंट्स शेअरची लक्ष्य किंमत 505 रुपये निश्चित केली आहे. शेअर्सची किंमत 558.85 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे. ब्रोकरेज फर्मने 505 रुपयाच्या लक्ष किमतीसह शेअरची रेटिंग कमी केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Berger Paints India Share Price | Berger Paints India Stock Price | BSE 509480 | NSE BERGEPAINT)

2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये ‘बर्जर पेंट्स’ कंपनीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीची कमाई वार्षिक तुलनेत 13.4 टक्क्यांनी घटली आहे. प्रदीर्घ मान्सून आणि मालाची वाढती किंमत यामुळे कंपनीच्या सेल्सवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, किमतीतील माफक वाढ, स्पर्धेचा वाढता दबाव आणि असंघटित क्षेत्राचा पुन्हा उदय यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत अधिक वाढू शकतो. वाढत्या किमती आणि लहान पुरवठादाराकडून मिळणारी अतिरीक्त सवलत यामुळे बर्जर पेंट्स कंपनीचा व्यवसाय नकारात्मकरित्या प्रभावित होऊ शकतो.

‘बर्जर पेंट्स’ कंपनीच्या शेअरने यापूर्वीही आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘बर्जर पेंट्स’ कंपनीचे शेअर्स 2 एप्रिल 2004 रोजी 4.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता मात्र शेअरची किंमत 115 पटीने वाढून 557.50 रुपयांवर पोहोचली आहे. 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत ‘बर्जर पेंट्स’ कंपनीच्या शेअरने 1 लाखावर 1.15 कोटी परतावा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 3 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 745.60 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि एका वर्षभरात शेअरची किंमत 29 टक्क्यांनी पडून 558.85 रुपयेवर आली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या स्टॉकमध्ये आणखी पडझड पाहायला मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Berger Paints India Share Price 509480 BERGEPAINT stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

#Berger Paints Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x