3 May 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील फेव्हरेट शेअर एका बातमीने पुन्हा तेजीत, लेटेस्ट डिटेल्स जाणून घ्या

Nazara Technologies Share Price

Nazara Technologies Share Price | अमेरिकन बँक कोसळल्याचा नकारात्मक परिणाम भारतातील बऱ्याच कंपन्यांवर पडला आहे. मागील काही दिवसापासून ‘नझारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. मात्र बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नझारा टेक्नोलॉजी’ कंपनीच्या शेअर मध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली. सोमवार आणि मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये होणाऱ्या घसरणीमागे एक मोठे कारण होते. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेमध्ये या कंपनीचे आणि तिच्या उपकंपन्याचे खाते आहेत. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 501.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Nazara Technologies Ltd)

‘नजारा टेक्नॉलॉजी’ चे स्पष्टीकरण :
‘नझारा टेक्नॉलॉजी’ कंपनीने दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, नझारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या दोन उपकंपनींनी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेत एकूण 64 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या. यापैकी 60 कोटी रुपये इतर बँक खात्यांमध्ये यशस्वीरित्या ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, SVB बँकेच्या खात्यात अजून 4 कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम गैर प्रतिबंधित ऑपरेटिंग वापरांसाठी ठेवण्यात आली आहे.

‘नझारा टेक्नॉलॉजी’ कंपनीने सांगितले की, तिच्या उपकंपन्या ‘किडोपिया इंक’ आणि ‘मीडियावर्क्स इंक’ यांना SVB मध्ये जमा असलेल्या 64 कोटी रुपयांचे ट्रान्स्फर करण्यात कोणताही अडथळा आला नाही. या खात्यामध्ये जमा असेलल्या एकूण रकमेपैकी 60 कोटी रुपये इतर बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले असून उर्वरित 4 कोटी रुपये गैर प्रतिबंधित ऑपरेशनल वापरासाठी SVB खात्यातच राहतील.

‘नझारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1100-1101 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर दणक्यात सूचीबद्ध झाले होते. ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे IPO शेअर पहिल्याच दिवशी बीएसई इंडेक्सवर 1971 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Technologies Share Price 543280 return on investment check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

#Nazara Technologies Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x