BHEL Share Price | PSU शेअर मजबूत तेजीच्या दिशेने, पण स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?

BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी महारत्न कंपनीच्या शेअरमधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएचईएल स्टॉक 3 टक्के वाढीसह 307.95 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून झारखंडमधील कोडरमा येथे 1600 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.  ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

या प्रकल्पामुळे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापित औष्णिक वीज निर्मिती क्षमता 2030 पर्यंत 8140 मेगावॅटपर्यंत वाढेल. या ऑर्डरचे एकूण मुल्य 13300 कोटी रुपये आहे. बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 322.35 रुपये होती. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.43 टक्के वाढीसह 301.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात बीएचईएल स्टॉक 260 टक्के वाढला आहे. 28 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 85.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 307.95 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 6 महिन्यांत सरकारी कंपनीचे शेअर्स 192.60 रुपयेवरून वाढून 300 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

मागील 2 वर्षांत बीएचईएल स्टॉक 570 टक्के वाढला आहे. या काळात बीएचईएल कंपनीचे शेअर्स 45.55 रुपयेवरून वाढून 307 रुपये किमतीवर पोहचले आहेत. नुकताच अदानी समूहाने बीएचईएल कंपनीला 7000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला 2 पॉवर प्लांट उभारण्याचे काम देण्यात आले आहे. पहिल्या ऑर्डरमध्ये 2X800 मेगावॅट क्षमतेचा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट रायपूर येथे उभारणीसाठी देण्यात आली आहे. तर दुसरी ऑर्डर 2X800 MW क्षमतेच्या मिर्झापूर सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटसाठी देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 29 June 2024.