
Birlasoft Share Price | बिर्लासॉफ्ट या आयटी कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत बिर्लासॉफ्ट कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 60.55 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 180.08 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( बिर्लासॉफ्ट कंपनी अंश )
यासह मागील एका वर्षात बिर्लासॉफ्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी बिर्लासॉफ्ट स्टॉक 3.62 टक्के घसरणीसह 650.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
सोमवारी बिर्लासॉफ्ट कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीत 112.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत बिर्लासॉफ्ट कंपनीची ऑपरेशनल इनकम 1,362.5 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची ऑपरेशनल इनकम 1226.3 कोटी रुपये होती. कंपनीच्या ऑपरेशनल इनकममध्ये वार्षिक आधारावर 11.10 टक्के वाढ झाली आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बिर्लासॉफ्ट कंपनीचा निव्वळ नफा 88.11 टक्क्यांच्या वाढीसह 623.76 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 331.58 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बिर्लासॉफ्ट कंपनीने 5,278.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.08 टक्के जास्त आहे.
29 एप्रिल रोजी बिर्लासॉफ्ट कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 676 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात बिर्लासॉफ्ट कंपनीच्या स्टॉकमध्ये 11 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात बिर्लासॉफ्ट कंपनीचे शेअर्स तब्बल 142 टक्के वाढले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 633 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर 92 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 861.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 264.75 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.