
Blue Chip Share Price | ब्लू चिप इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 671 टक्के मजबूत झाले आहेत. मार्च 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.35 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्लू चिप इंडिया कंपनी अंश )
आता हा स्टॉक 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2600 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी ब्लू चिप इंडिया स्टॉक 1.85 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
YTD आधारे ब्लू चिप इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 27 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. जानेवारी 2024 मध्ये ब्लू चिप इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 4 टक्क्यांनी वाढली होती मार्च 2024 या महिन्यात हा स्टॉक 17 टक्क्यांनी घसरला होता. 3 एप्रिल, 2023 रोजी ब्लू चिप इंडिया कंपनीचे शेअर्स 0.49 पैसे या आपल्या 52-आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 451 टक्के वाढले आहेत. 5 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.58 रुपये या आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
ब्लू चिप इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतात विविध आर्थिक क्रियाकलापांसंबंधित व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः इक्विटी शेअर्सची ट्रेडिंग आणि वित्तीय सेवा संबंधित व्यवसाय करते. ब्लू चिप इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना 1993 साली कोलकाता येथे झाली होती. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या मागील तिमाहीत या कंपनीला 0.03 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 0.02 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.