
Blue Jet Healthcare IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO ची मुदत शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होईल. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची बँड 329 रुपये ते 346 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. तीन ट्रेडिंग सेशनपूर्वी ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
त्यापूर्वी ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड IPO ची सर्वोच्च GMP किंमत 95 रुपये होती. स्टॉकची सध्याची 72 रुपये GMP किंमत पाहता ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक 418 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच IPO च्या इश्यू किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 21 टक्के नफा मिळू शकतो.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत जाहीर करण्यात आला आहे. या IPO मध्ये कंपनी 24,285,160 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. IPO च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या IPO चा आकार 840.27 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या प्रवर्तक गटात शिवेन अक्षय अरोरा, अक्षय बन्सरीलाल अरोरा, अर्चना आणि अक्षय अरोरा सामील आहेत. शिवेन अक्षय अरोरा या IPO अंतर्गत 5,918,849 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. अक्षय बन्सरीलाल अरोरा आपले 18,366,311 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणूनकोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, जे . पी . मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर या कंपनीच्या IPO साठी रजिस्ट्रार म्हणून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे. ब्लू जेट ही कंपनी मुख्यतः एक आरोग्य सेवा कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः औषधे आणि आरोग्य सेवा सामग्री संबंधित सेवा प्रदान करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.