
Bonus Share News | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीने १:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याची निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात या कंपनीचा एक शेअर असेल तर दुसरा शेअर मोफत जमा केला जाईल.
श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीने अपडेट दिली
श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती देताना सांगितले आहे की, ‘श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीने शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ रोजी १:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड ही मुंबईस्थित प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 452 कोटी रुपये आहे.
श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअर 3 टक्क्यांनी घसरून 221.40 रुपयांवर पोहोचला होता. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 452 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 249 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 90.15 रुपये होता. मागील ६ महिन्यात या शेअरने 107% परतावा दिला आहे. तर मागील ५ वर्षात या शेअरने 4111 टक्के परतावा दिला आहे.
शेअरची ट्रेडिंग रेंज
11 सप्टेंबर 2019 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअर 5.55 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 222.80 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची मंगळवारची बंद किंमत 228.25 रुपये होती. बुधवारी दिवसभरात हा शेअर 219 रुपये ते 231 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 90.15 रुपये ते 249 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.