12 December 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Bonus Shares | फुकट दारू पेक्षा फुकट शेअर्स मिळवा! ही वाईन कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, अल्पावधीत पैसा वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | जीएम ब्रुअरीज या अल्कोहोलिक ड्रिंक्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी मुख्यतः बोनस शेअर्स वाटप करण्याच्या घोषणेमुळे निर्माण झाली आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीएम ब्रुअरीज कंपनी अंश )

जीएम ब्रुअरीज कंपनीने 4 एप्रिल रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी जीएम ब्रुअरीज कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के वाढीसह 732.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची बातमी प्रसिद्ध होताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी जीएम ब्रुअरीज कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली. दरम्यान कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 808 रुपये होती.

डिसेंबर 2023 तिमाहीत जीएम ब्रुअरीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात 13 टक्के घट पाहायला मिळाली होती. तर डिसेंबर तिमाहीत या कंपनीचा EBITDA 24.3 टक्के घसरून 25.2 कोटी रुपयेवर आला होता. EBITDA मार्जिन देखील 22 टक्के वरून घसरुन 16 टक्केवर आले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 27 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on GM Breweries Share Price 02 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x