15 December 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्टमध्ये या किमतीवर ब्रेकआउट, लवकरच स्टॉक ही टार्गेट प्राईस गाठणार

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 24.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )

नुकताच येस बँकेला त्याच्या सिक्युरिटी रिसीट पोर्टफोलिओमधील एका ट्रस्टकडून 366 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे येस बँकेचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 24.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना इन्कम टॅक्स विभागाकडून डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे. येस बँकेचे शेअर्स मागील आठवड्यात गुरुवारच्या सेशनमध्ये 23.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँकेच्या शेअर्सने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

येस बँकेने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांनी जेसी फ्लॉवर एआरसी कंपनीसोबत नॉन-परफॉर्मिंग ॲसेटच्या विक्रीबाबत बोलणी सुरू केली होती. या संदर्भात, येस बँकेला सिक्युरीटी पावत्यांवर ट्रस्टकडून 366 कोटी रुपये मिळाले आहेत.

सेबी फाइलिंगमध्ये, येस बँकेने माहिती दिली की, त्यांना आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट युनिटकडून 112.81 कोटी रुपयेची डिमांड नोटीस मिळाली आहे. येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या व्यवसायावर नुकसान भरपाई, दंड इत्यादींमुळे कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.

तज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये 23 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. नुकताच हा स्टॉक 19 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आता अनेक ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 27 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मात्र तज्ञांनी गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करताना 18 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 02 April 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x