19 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरवर टार्गेट प्राईस जाहीर, 3 महिन्यात दिला 128 टक्के परतावा, सुझलॉन शेअरने पुढे किती कमाई होणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी लवकरच कर्जमुक्त होणार आहे. यासाठी कंपनीला तब्बल 15 वर्ष वाट पाहावी लागली आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (Suzlon Energy Share Price)

आता हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीच्या 2 टक्के खाली ट्रेड करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 19.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी शेअर 4.77% वाढीसह 20.85 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज म्हणजे बुधवारी देखील शेअर 4.56 टक्के (सकाळी १०:३०) वधारून 21.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी स्टॉक टार्गेट प्राईस

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर मजबूत स्थित ट्रेड करत आहेत. हा स्टॉक 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजवर खरेदी विक्री व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते अपट्रेण्ड मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सला 20.1 रुपये ते 20.6 जवळ अल्प प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. तर डाउनसाइडवर या स्टॉकमध्ये 19.5 रुपये ते 19.0 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळू शकतो.

त्याचप्रमाणे ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते सुझलॉन कंपनीच्या स्टॉकमध्ये सकारात्मक संकेत पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी 17 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 22 ते 23 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. 23 रुपये लक्ष किंमत ओलांडल्यावर हा स्टॉक 25 रुपये आणि नंतर 26 रुपये किंमत देखील स्पर्श करू शकतो.

सुझलॉन एनर्जी स्टॉक परतावा

सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 9 जून 2008 रोजी 460 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 454.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये इतकी घसरण झाली की स्टॉक 5 रुपये पर्यंत खाली आला होता. 18 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच या कंपनीच्या शेअरची किंमत 95.65 टक्के कमजोर झाली आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे.

मागील 13 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.60 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 222 टक्क्यांनी वाढली आहे. तर 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.25 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. आता हा स्टॉक आपल्या उच्चांकी किमतीवरून 7 टक्के घसरला आहे. वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत स्टॉक आता 200 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 13 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.60 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. अवघ्या 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 21.25 रुपये उच्चांक किमतीवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 23 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x