
Bonus Shares | जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने आपल्या मार्च 2024 तिमाही निकालांसह गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. नुकताच जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी अंश )
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 3 वर्षात 1000 टक्के वाढली आहे. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 9.64 टक्के वाढीसह 256 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअर्सवर 1 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत 16.1 रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 268 कोटी रुपये वाढून 295 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधां संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी 1980 साली स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी देखील काम करते. रेल्वेसाठी जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी स्लीपर, पूल आणि आरओबी तयार करण्याचे काम करते. या कंपनीला परदेशातूनही रेल्वेच्या ऑर्डर मिळतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.