
Bonus Shares | पैसालो डिजिटल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही डिजिटल कंपनी RBI अंतर्गत श्रेणी B-NBFC नॉन डिपॉझिट कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे. या कंपनीची नोंदणी 05 मार्च 1992 रोजी कंपनी कायदा 1956 अंतर्गत खाजगी मर्यादित कंपनी म्हणून झाली होती. Paisalo Share Price
1 मार्च 1995 रोजी ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी पैसालो डिजिटल स्टॉक 14.58 टक्के वाढीसह 161.10 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पैसालो डिजिटल कंपनीने आपल्या विद्यामन शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 20 मार्च 2024 हा दिवस जाहीर केला आहे. ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करणार आहे.
पैसालो डिजिटल कंपनीच्या उत्पन्नात मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 55.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीने 110 कोटी कमाई केली होती. तर डिसेंबर 2023 तिमाहीत पैसालो डिजिटल कंपनीने 171 कोटी रुपये कमाई केली आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 56.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 27.7 कोटी नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 102.5 टक्के वाढ झाली आहे.
पैसालो डिजिटल कंपनीने या तिमाहीत NII म्हणजेच (नेट इंटरेस्ट इन्कम) उत्पन्नात वार्षिक आधारावर 60.9 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीचे NII उत्पन्न 62 कोटी रुपये होते. आता त्यात वाढ झाली असून, कंपनीने 98.8 कोटी रुपये NII कमाई केली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत पैसालो डिजिटल कंपनीचा एकूण NPA 0.23 टक्के होता. तर निव्वळ NPA 0.02 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.