 
						Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अफाट तेजीसह वाढत होते. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 114.75 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सालासर टेक्नो कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. Salasar Techno Share Price
सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स अवघ्या 5 दिवसात 66.85 रुपये किमतीवरून 117 रुपये किमतीवर पोहचले होते. आता ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स देणार आहे. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 7.28 टक्के वाढीसह 117.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
नुकताच सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच सालासर टेक्नो कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेट म्हणून 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. ही कंपनी दुसऱ्यांदा आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
यापूर्वी जून 2022 मध्ये सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत दिले होते. यासह कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभजित केले होते.
मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2900 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 एप्रिल 2020 रोजी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 3.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 117 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 6 महिन्यांत सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात सालासर टेक्नो कंपनीचे शेअर्स 51.80 रुपये किमतीवरून 117 रुपये किमतीवर पोहचले होते. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 117.89 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 36 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		