
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभ देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स ही कंपनी लवकरच आपले शेअर्स विभाजित करणार आहे, त्यानंतर कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. Standard Capital Markets Share Price
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टँडर्ड कॅपिटल मार्केट लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटबाबत घोषणा केली होती. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 55.57 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स 100 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या संचालकांनी आपले शेअर 10 तुकड्या विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 1 रुपये होईल. यासह कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने याबाबतची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.
मागील 1 वर्षात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स 55.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.