
Bosch Share Price | बॉश लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 280 लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.
पूर्वीच्या तुलनेत यावेळी बॉश लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक लाभांश देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 210 रुपये लाभांश वाटप केला होता.आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 18,818.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर प्रति शेअर 280 रुपये लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2800 टक्के म्हणजेच 280 रूपये लाभांश वाटप करणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉश लिमिटेड कंपनीचे शेअर 18763.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका वर्षात बॉश लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारानी या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.25 टक्के वाढले आहे. बॉश लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19,850.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 13,165 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.