
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 78 टक्के घसरल्यानंतर आता दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. मागील 5 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये 20.66 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
मागील 13 दिवसांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 70 टक्के मजबूत झाले आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 16.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची वाटचाल :
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 9 रुपयांवरून वाढून 16 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मागील 13 दिवसांत 71 टक्के मजबूत झाले आहेत. 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 15.81 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 13 दिवसांपूर्वी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.70 लाख रुपये झाले असते.
गुंतवणुकीवर परतावा :
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात हा स्टॉक 13 रुपयांवरून वाढून 16 रुपयांवर पोहचला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.85 रुपये होती. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 9.27 रुपये होती. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे बाजार भांडवल 3190 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 52.95 टक्के कमजोर झाले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.