Brightcom Group Share Price | शेअरची आजची किंमत 18 रुपये! शेअर तुफान तेजीत, मागील 3 वर्षांत 600 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला
Highlights:
- Brightcom Group Share Price
- मागील 3 वर्षांत 600 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा
- दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्याकडे1.24 टक्के भाग भांडवल
- ब्राइटकॉम ग्रुप कंपनीची आर्थिक कामगिरी
- आर्थिक गोंधळाच्या प्रकरणात सेबीने कंपनीला निरीक्षण कक्षेत ठेवले होते

Brightcom Group Share Price | मार्च 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 17.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकने 9.27 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.
शेअर नीचांक किंमत पातळीपासून 75 टक्क्यांनी वाढला
आपल्या नीचांक किंमत पातळीपासून हा स्टॉक तब्बल 75 टक्क्यांनी वाढला आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 18.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 3 वर्षांत 600 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा
मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 90.82 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील एका वर्षाच्या कालावधीत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने लोकांना 70.87 हक्क नकारात्मक परतावा दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा कमावून दिला होता.
दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्याकडे1.24 टक्के भाग भांडवल
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील मार्च 2023 तिमाहीपर्यंत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 25,000,000 शेअर्स म्हणजेच 1.24 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत.
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीची आर्थिक कामगिरी
डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने एकूण 2,865.17 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. जी त्यापूर्वीच्या 2,021.33 कोटी रुपये निव्वळ विक्रीच्या तुलनेत 41.75 टक्के अधिक आहे. तिमाही कालावधीत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 543.93 कोटी रुपये निव्वळ कमावला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 371.45 कोटी पेक्षा 46.44 टक्के अधिक आहे.
ब्राइटकॉम ग्रुपच्या ग्राहकांच्या यादीत भारती एअरटेल, ब्रिटिश एअरवेज, कोका कोला, ह्युंदाई मोटर्स, आयसीआयसीआय बँक, आयटीसी यांसारखें दिग्गज कंपन्या सामील आहेत.
आर्थिक गोंधळाच्या प्रकरणात सेबीने कंपनीला निरीक्षण कक्षेत ठेवले होते
आर्थिक गोंधळाच्या प्रकरणात सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीला निरीक्षण कक्षेत ठेवले होते. सेबीने 2014-15 ते 2019-20 या कालावधीतील आर्थिक स्टेटमेंट्सची चौकशी करून आर्थिक विवरणांमध्ये अनियमिततेचा संशय व्यक्त केला होता. सेबीच्या मते ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने खर्च कमी करून FY20 साठी त्याचा नफा 868.30 कोटीपर्यंत वाढवला होता.
SEBI ला चौकशीत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या परदेशातील उपकंपन्यांशी संबंधित लेखा पुस्तके आणि इतर माहितीमध्ये तफावती पाहायला मिळाल्या होत्या. यामुळे सेबीने ब्राइटकॉम ग्रूपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Brightcom Group Share Price today on 31 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB