
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के वाढली आहे. (Brightcom Group Share Price)
शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. या काळात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत 9 रुपयेवरून 31 रुपयेवर पोहचली आहे.
गुंतवणुकीवर परतावा
28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.35 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 30 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 31.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 233 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2 महिन्यांपूर्वी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.36 लाख रुपये झाले असते.
मागील 1 महिन्यात 67 टक्के परतावा दिला
मागील 1 महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची किंमत 67 टक्के वाढली आहे. 31 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 18.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 जून 2023 रोजी हा स्टॉक 31.50 रुपये किमतीवर पोहचला आहे.
शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुपचे 2.5 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.