
Buyback of Shares | राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी राजू इंजिनियर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर बायबॅकबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. राजू इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स ESM स्टेज-2 मध्ये आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 160 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Rajoo Engineers Share Price
राजू इंजिनियर्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 965 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 30 रुपयेवरून वाढून 160 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये बायबॅकच्या चर्चेमुळे अधिक तेजी येण्याची शक्यता आहे. जेव्हा एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स खुल्या बाजारातून पुन्हा खरेदी करते, या प्रक्रियेला बायबॅक म्हणतात.
एखादी कंपनी जेव्हा बायबॅक करते, तेव्हा कंपनीचे भाग भांडवल घटते. जे शेअर्स खुल्या बाजारातून कंपनी खरेदी करते, ते शेअर्स रद्द केले जातात. म्हणजेच बायबॅक केलेले शेअर्स कंपनी पुन्हा शेअर बाजारात जारी करु शकत नाही इक्विटी भांडवलात घट झाल्यामुळे अशा कंपन्याची शेअर कमाई म्हणजेच EPS मध्ये वाढ होते. तर बायबॅकद्वारे शेअर्सच्या P/E प्रमाणात वाढ होते. राजू इंजिनियर्स ही कंपनी मुख्यतः पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करते. मुख्यतः कंपनी खाद्यतेल, दूध इत्यादींसह अनेक गोष्टींचे पॅकेजिंग करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.