12 October 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो

Highlights:

  • Carysil Share Price
  • 40 टक्के परतावा मिळू शकतो
  • गुंतवणुकदार करोडपती – 96503 टक्के परतावा दिला
  • कॅरीसिल शेअर्सचा ट्रेंड
Carysil Share Price

Carysil Share Price | कॅरीसिल या जगातील सर्वात मोठ्या किचन सिंक निर्मात्यां कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 17.42 टक्के वाढले आहेत. दीर्घ काळ स्टॉक होल्ड करणाऱ्या लोकांना या कंपनीच्या शेअरने 11,000 रुपये गुंतवणुकीवर लखपती बनवले आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्या आणि तज्ञ या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत आहेत.

40 टक्के परतावा मिळू शकतो

मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा नफा किंचित प्रमाणात घटला आहे. परंतु व्यवसाय वाढीची शक्यता लक्षात घेऊन तज्ञांनी स्टॉकवर सकारात्मक रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढू शकतात.

कॅरीसिल ही कंपनी मुख्यतः किचन सिंक, स्पाउट्स, फूड वेस्ट डिस्पोजर युनिट्स ओव्हन, हॉब्स, कुकटॉप्स, वाईन चिलर आणि डिशवॉशर बनवण्याचे काम करते. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 560.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुंतवणुकदार करोडपती – 96503 टक्के परतावा दिला

कॅरीसिल कंपनीचे शेअर्स 4 जून 2004 रोजी 58 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत शेअरची किंमत 96503 टक्क्यांनी वाढून 560.30 रुपयेवर पोहोचली आहे. ज्या लोकांनी 2004 मध्ये या स्टॉकमध्ये केवळ 11,000 रुपये लावले होते, ते लोक 19 वर्षांत करोडपती झाले आहेत. मागील वर्षी 19 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक 742.45 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. 18 जानेवारी 2023 पर्यंत शेअरची किंमत 42 टक्क्यांनी घसरून 431.35 रुपये या नीचांक पातळीवर आली होती. आतापर्यंत शेअरची किंमत नीचांक किमतीवरून 30 टक्के वाढली आहे.

कॅरीसिल शेअर्सचा ट्रेंड

कॅरीसिल या सिंक बनवणाऱ्या कंपनीचे मार्च तिमाहीचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा चांगले होते. ब्रोकरेज फर्मच्या 142 कोटीच्या अंदाजाच्या तुलनेत कंपनीची कमाई वार्षिक 5 टक्क्यांनी वाढून 146 कोटी रुपयेवर पोहोचली आहे. देशांतर्गत व्यवसायातून कंपनीने 31 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या निर्यात कमाईमध्ये वार्षिक आधारावर 3 टक्क्यांची वाढ झाली असून 114 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 24 टक्क्यांच्या घसरणीसह 12.4 कोटी रुपयेवर आला आहे.

ब्रोकरेज फर्म नुवामाच्या मते, जगभरातील आकर्षक उत्पादनांची वाढती मागणी पाहता, गृह सुधारणेवरील खर्चात वाढ आणि अनुकूल उद्योग याच्या वाढीला चांगले प्रोत्साहन मिळणे अपेक्षित आहे. उच्च क्वार्ट्ज इन्व्हेंटरीमुळे FY23 मध्ये कंपनीच्या कमाईमध्ये घट झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महसूल वाढीमध्ये जबरदस्त सुधारणा होण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने शेअरची लक्ष किंमत 786 रुपये निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Carysil Share Price today on 31 May 2023.

हॅशटॅग्स

Carysil Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x