
CCD Share Price | कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीशी संबंधित अनेक सकारात्मक बातम्या समोर आल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे. (Cafe Coffee Day Share Price)
कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 46.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग केली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 5.31 टक्के घसरणीसह 43.47 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. कॅफे कॉफी डे ग्लोबल लिमिटेड या कॅफे कॉफी डे कंपनीचे संचालन करणाऱ्या कंपनीने जून 2023 तिमाहीत 24.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती तिमाही निकालात जाहीर केली आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत कॅफे कॉफी डे ग्लोबल कंपनीला 11.73 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
जून 2023 या तिमाहीमध्ये कॅफे कॉफी डे ग्लोबल कंपनीने 223.20 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच जून तिमाहीत कंपनीने 189.63 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 तिमाहीत कॅफे कॉफी डे कंपनीने 250 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मीडिया रिपोर्टनुसार अहमदाबाद स्थित एका असेट रिकॉन्स्ट्रक्शन कंपनीने कॉफी डे ग्लोबल कंपनीचे कर्ज खरेदी करण्यासाठी RBL बँकेला ऑफर दिली आहे.
रेअर ARC कंपनीने कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीवरील 110.4 कोटी रुपये कर्जाच्या रकमेवर RBL बँकेला 68 कोटी रुपये मिळवून देण्याची ऑफर दिली आहे. कॅफे कॉफी डे ग्लोबल ही कंपनी कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस या कंपनीची मुख्य सूचीबद्ध कंपनी म्हणून ओळखली जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.