
CEAT Share Price Today | ‘सीएट लिमिटेड’ या टायर निर्माता कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 1747.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.51 टक्के वाढीसह 1,714.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सीएट कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त उसळी तिमाही नफा जाहीर केल्यामुळे पाहायला मिळत आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या मार्च तिमाहीत ‘सीएट लिमिटेड’ कंपनीच्या नफ्यात 5 पट वाढ नोंदवली गेली आहे.
CEAT Limited Stock Price Today on NSE & BSE
मागील 5 दिवसात CEAT कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. CEAT कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1981.45 रुपये होती. तर कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 12 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणाही केली आहे.
मार्च 2023 तिमाहीत ‘सीएट लिमिटेड’ कंपनीच्या नफ्यात 420.7 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत CEAT कंपनीने 132.42 कोटी रुपये नफा कमावला होता. सीएट कंपनीने एक वर्षापूर्वी मार्च तिमाही कालावधीत 25.43 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 10.9 टक्के वाढीसह 2877.21 कोटी रुपये कमाई केली आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये CEAT कंपनीच्या नफ्यात 279.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 206.27 कोटी रुपये नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये CEAT कंपनीने 54.33 कोटी रुपये नफा कमावला होता.
CEAT कंपनीच्या शेअर्सने मागील 11 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 977.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1747.90 रुपयेवर पोहोचले आहेत. CEAT कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 890 रुपये होती. तर मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 27 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.