
Cera Sanitaryware Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे शेअर्स 5.60 टक्के वाढीसह 7,200.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 6815.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 7356 रुपये किमतीवर पोहोचला होता.
विजय केडिया यांची गुंतवणूक :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये ‘सेरा सॅनिटरीवेअर’ कंपनीचे एक लाख शेअर्स आहेत. जानेवारी ते मार्च 2023 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीत विजय केडिया यांचे नाव नाही. ज्या गुंतवणूकदारांचा कंपनीत एक टक्क्यांहून अधिक हिस्सा असतो, त्यांचे नाव शेअर धारकांच्या यादीत सामील केले जाते. विजय केडिया यांची हिस्सेदारी 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे, म्हणून त्यांचे नाव वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीत नाही.
म्युच्युअल फंडाची गुंतवणूक :
जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाने ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे 2,16,917 शेअर्स म्हणजेच 1.67 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. HSBC स्मॉल कॅप फंडाने ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे 3,09,245 शेअर्स म्हणजेच 2.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर टाटा फ्लेक्सी कॅप फंडाने ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे 4,00,886 शेअर्स म्हणजेच 3.08 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
मल्टीबॅगर रिटर्न्स :
सेरा सॅनिटरीवेअर स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी या कंपनीच्या स्टॉकने 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.