9 June 2023 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Credit Card | सावधान! क्रेडिट कार्ड वापरताय? क्रेडिट रिपोर्ट तपासला नसेल तर तुमचे भयंकर नुकसान होऊ शकते, डिटेल वाचा

Credit Card

Credit Card | पूर्वीपेक्षा आता क्रेडिट कार्डचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. आजकाल लोक क्रेडिट कार्डचा वापर करून अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटचा लाभ घेत असतात. तथापि, क्रेडिट कार्डचा अतिवापर केल्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोझा पडू शकतो, आणि याचा तुमच्या क्रेडिट रिपोर्टवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर नकारात्मक परिणाम पडू नये याची काळजी घेतली पाहिजे.

क्रेडिट अहवाल :
क्रेडिट रिपोर्ट हा सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. या रिपोर्ट वरून तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. तुमच्या सर्व कर्जाचे तपशील तुमच्या क्रेडिट रिपोर्टसोबत जोडलेले असते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट अहवालातील कोणतीही विसंगती तुम्हाला अडचणीच्या वेळी कर्ज घेताना अडथळा निर्माण करू शकते.

क्रेडिट रेकॉर्ड तपासणे आवश्यक :
तुम्ही तुमचा क्रेडिट अहवाल नियमितपणे तपासता का? नाही? अशी चूक करू नका. आपण क्रेडिट अहवाल नियमित तपासा. प्रत्येक तपशील काळजीपूर्वक चेल करा. क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या क्रेडिट व्यवहाराशी संबंधित सर्व तपशील दिलेला असतो, जसे की तुमची कर्ज परतफेड रक्कम, क्रेडिट कार्डची परतफेड रक्कम, दंड, शुल्क, यांचा समावेश असतो. क्रेडिट अहवाल तपासताना तुम्ही तुमच्या कर्ज खात्याचे तपशील, कर्ज परतफेडीचे डिटेल्स आणि क्रेडिट कार्ड पेमेंटची हिस्ट्री काळजीपूर्वक तपासली पाहिजे.

क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी :
क्रेडिट कार्ड वापरताना आणि त्याचे बिल्स किंवा अहवाल चेक करताना तुम्ही तुमच्या कर्जाचे रेकॉर्ड डिटेल्स, क्रेडिट कार्डचे रेकॉर्ड, अकाऊंट नंबर आणि कर्जाचा प्रकार, तुमचे नाव, पत्ता, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि सार्वजनिक माहिती जसे की मुदतपूर्व बंद किंवा दिवाळखोरी ही माहिती तपासून खात्री करून घ्यावी. क्रेडिट रिपोर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या नावावर सुरू असलेले कर्जे, क्रेडिट कार्ड किंवा बँक खाती यासंबंधित माहिती जाणून घेण्यासाठी करू शकता. क्रेडिट रिपोर्ट अहवाल चेक करताना नेहमी आपला पत्ता, मोबाईल नंबर, पॅन तपशील इत्यादी बरोबर आहे की नाही हे तपासले पाहिजे. तुम्ही बँक खाते क्रमांक आणि चालू किंवा बंद खात्यांची स्थिती देखील काळजीपूर्वक तपासली पाहिजे.

क्रेडिट रिपोर्ट मध्ये त्रुटी असल्यास काय करावे? :
समजा क्रेडिट कार्ड अहवाल चेक करताना तुम्हाला काही असामान्य चुका किंवा त्रुटी आढळल्यास तुम्ही त्वरित यासंबंधित माहिती क्रेडिट ब्युरोला कळवावी. त्यांना तुमच्या अहवालात सुधारणा किंवा दुरुस्ती करण्याची विनंती करावी. वेगवेगळ्या क्रेडिट ब्युरोचे क्रेडिट अहवाल तपासा आणि तुम्हाला प्रत्येक अहवालात तफावत किंवा विसंगती दिसल्यास त्वरित कारवाई करावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit Card Statement details need to check regularly to avoid loss and financial scam on 1 December 2022

हॅशटॅग्स

#Credit Card(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x