14 December 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाही निकाल (NSE: IREDA) जाहीर केल्यानंतर या कंपनीच्या शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.88 टक्के वाढून 223.46 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.69 टक्के घसरून 221.15 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)

नवीन उपकंपनी स्थापन
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 10 ऑक्टोबर 2024 रोजी मान्यता दिली आहे. ही नवीन उपकंपनी रिटेल व्यवसायाकडे विशेष लक्ष केंद्रित करेल असं कंपनीने म्हटलं आहे.

दुसऱ्या तिमाहीचे निकाल
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ३८८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतील 384 कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफा 1% वाढला आहे. तर महसुलात 8% वाढ झाली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा खर्च 47 टक्क्यांनी वाढून 1170 कोटी रुपये झाला आहे.

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा ‘PBT’ 460 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी 380 कोटी रुपये होता, परंतु आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतील 476 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहे.

इरेडा शेअर्सबाबत तज्ज्ञांचा सल्ला
वृद्धी इन्व्हेस्टमेंट ब्रोकरेज फर्मचे CEO विवेक करवा म्हणाले की, ‘एकंदरीत कंपनीचे निकाल चांगले आहेत. हा शेअर २९०-३०० रुपयांच्या पातळीवर पोहोचला तेव्हा त्याने २१०-२२० रुपयांच्या पातळीवरून उसळी दिली. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर कॉन्सोलीडेशनच्या टप्प्यात असून आणखी काही दिवस तो असाच सुरू राहू शकतो.

इरेडा शेअरने दिलेला परतावा
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने २०२४ मध्ये आतापर्यंत १२२% परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत या शेअरने ४०% परतावा दिला आहे. तसेच 32 रुपयांच्या आयपीओ किमतीपासून इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर तब्बल 628 टक्क्यांनी वधारला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x