 
						Dhampur Sugar Share Price Today | ‘धामपूर शुगर मिल्स लिमिटेड’ या साखर उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीसाठी 60 टक्के अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. (Dhampur Sugar Limited)
नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने हा अंतरिम लाभांशाचा निर्णय जाहीर केला आहे. ‘धामपूर शुगर मिल्स लिमिटेड’ कंपनी आपल्या शेअर धारकांना 50 टक्के अंतरिम लाभांश आणि 10 टक्के विशेष लाभांश देणार देईल. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या साखर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के वाढीसह 248.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
लाभांश तपशील :
‘धामपूर शुगर मिल्स’ कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी आपल्या गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश म्हणून प्रति इक्विटी शेअर 5 रुपये आणि विशेष लाभांश म्हणून 1 रुपये प्रति शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. कंपनी गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश म्हणून दर्शनी मूल्याच्या 50 टक्के आणि विशेष लाभांश म्हणून 10 टक्के असे एकूण 60 टक्के लाभांश वितरीत करेल. धामपूर शुगर मिल्स कंपनीने अंतरिम लाभांशाची एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणून 18 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
गेल्या एका वर्षभरात धामपूर शुगर कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. मागील एका वर्षात हा स्टॉक 54.02 टक्के स्वस्त झाला आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 150 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 90.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 231 रुपये किमतीवर पोहचला होता. अशा प्रकारे या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 154 टक्के वाढवले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,518 कोटी आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 5.05 टक्के वाढ नोंदवली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		