14 December 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger IPO | पैशाचा पाऊस! हा शेअरने 3 दिवसात पैसा दुप्पट, आजही 5% वाढले, स्टॉकबद्दल तज्ज्ञांनी काय म्हटले पहा

Multibagger IPO

Multibagger IPO | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचा नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून या आयपीओने स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. BSE SME इंडेक्सवर या IPO स्टॉकने आपल्या शेअर धारकांना अवघ्या तीन दिवसांत दुप्पट परतावा कमावून दिला आहे. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून अपर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या SME कंपनीचा IPO 52 ते 54 रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीवर लाँच करण्यात आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात 90 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकमध्ये प्रचंड प्रॉफिट बुकींग होऊनही या कंपनीचा स्टॉक अप्पर सर्किटवर लागला होता. सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागला होता. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 मध्ये 4.96 टक्के वाढीसह 130.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही किंमत त्याच्या 52 ते 54 रुपये या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 140 टक्के अधिक आहे.

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
शेअर बाजार तज्ञांनी ज्या लोकांना IPO स्टॉक वाटप करण्यात आले आहे, त्यांना आंशिक प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ गुंतवणुकदारांना 50 टक्के प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला देत आहेत. जेव्हा या कंपनीचा IPO शेअर बाजारात आला होता, तेव्हा या स्टॉक ला गुंतवणूकदारांनी शानदार प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केट मध्ये हा स्टॉक प्रमियम किमतीवर ट्रेड करत होता,

ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स ही कंपनी मुख्यतः संरक्षण क्षेत्रात उद्योग तेही विशेषतः ड्रोन संबंधित उद्योग करते. ही एक ड्रोन सोल्यूशन्स कंपनी असून तिला कॉन्टॅक्टलेस सेलिंगचा फायदा मिळेल, जी भारत सरकार ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मसाठी लागू करण्याचा विचार करत आहे. कंपनी आपली ड्रोन सेवा कॉन्टॅक्टलेस सेलिंग आणि डिलिव्हरी साठी देईल, आणि त्यातून कमाई करेल.

शेअर किंमत इतिहास :
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कंपनीचा आयपीओ 13 ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 52 ते 54 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉट मध्ये 2000 शेअर्स जारी करण्यात आले होते, आणि त्यासाठी त्यांना 1.08 लाख रुपये गुंतवणूक करावे लागले होते.

IPO तपशील :
या कंपनीचा IPO 243.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला बता 330.82 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या SME IPO मध्ये QIB साठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 46.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. आणि NII साठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 287.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. हा नुकताच लिस्ट झालेल्या IPO स्टॉक 29 डिसेंबर 2022 रोजी BSE SME इंडेक्समध्ये 130.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger IPO of DroneAcharya Aerial Innovations share Price is zooming rapidly 29 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x